Monday, September 21, 2009

मी निवडून आल्यावर.....!!


एकदा तरी साहेब तिकीट द्या आंम्हाला ,
मी निवडून आल्यावर पैसाच पैसा तुंम्हाला !
PM च्या खुर्चीवर असेल माझा दावा ,
मी थोडे खाईन तुम्ही थोडे खावा !
उरले तर थोडे देवून टाकू पक्षाला ,
मी निवडून आल्यावर पैसाच पैसा आपल्याला ..!!
इकडले पैसे खाऊ , तिकडले पैसे खाऊ ,
गरज पडली तर आणखीन वर्ल्ड बँकेतून घेऊ !
आपले पोट भरल्यावर दिवाळखोरीत काढू देशाला ,
आन मी निवडून आल्यावर साहेब भीताय कश्याला ...!
- गजानन देसाई

mi nivdin alyavar

mi